श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठधीश परमपूज्य अण्णासाहेब मोरे गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने व आज्ञेने सकल विश्वकल्याणासाठी तसेच कोरोना सारख्या भयानक संकटातून अखिल मानवांच्या संरक्षणासाठी, शारीरिक व मानसिक आरोग्य जपले जावे,तसेच उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी,या विश्वाची जन्ममाता आई भवानीची अतीउच्च कोटीची सेवा उद्या शनिवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ७:०० वाजता जगभरात ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

याचेच महत्वाचा भाग विश्वाच्या उत्पत्ती पासून ज्या ज्या वेळी संकटे आली त्यांच्या निवारणार्थ या विश्‍वाची माता जगतजननी भगवतीला शरण जावे लागले. याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. वेदग्रंथ व धर्म ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख देखील आहे. पूज्य गुरुमाऊली सेवेकरी व भाविकांकडून सर्व अध्यात्मिक सेवा विज्ञानावर आधारित करून घेत आहेत.

शेजारील राष्ट्रांना पासून संरक्षण, देशा अंतर्गत असलेला भ्रष्टाचार, सर्व अस्थिरता निवारणार्थ, तसेच आता कोरोना सारख्या महामारी तून सकल विश्वाचे संरक्षण करण्यासाठी याच जगतमाता आई भवानीला शरण गेल्यास आई भवानी निश्चित सर्वांना आशीर्वाद देईल आणि यातून विश्वाला संकटापासून मुक्त करेल. यासाठीच परम पूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व आज्ञेने विश्वभर शनिवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ७:०० वा सामूहिक ऑनलाईन श्रीदुर्गासप्तशती पारायण सेवा आयोजित करण्यात आली आहे. या सेवेमध्ये जगभरातून लाखो संख्येने सेवेकरी सहभागी होणार आहेत. तरी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन पारायण या दिवशी करावे. ज्यांच्याकडे ग्रंथ नसतील त्यांनी गुरुपीठाच्या यूट्यूब चैनल वर आपली सेवा विश्वकल्याणासाठी रुजू करावी. तरी आपण या विश्वकल्याण व राष्ट्र संरक्षण सेवेत आपला एक तास वेळ द्यावा ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here