श्रीरामपुर/प्रतिनिधी :- ‘कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गेली तीन चार महिने गाफील राहिलो. त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. ही साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

श्रीरामपूर विश्रामगृहावर अधिकारी, पदाधिकार्‍यांबरोबर कोरोनाबाबत आढावा बैठक मुश्रीफ यांनी घेतली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदीक यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बिल आकारले जात असून त्यांच्या बिलाचे ऑडीट झाले पाहिजे. ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले

‘शिर्डी येथे लवकरच २ हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. यामुळे सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here