श्रीरामपुर / प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन मुदत वाढविण्यात आली आहे. १५ मे पर्यंत पुन्हा पुढे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटे, मोठे व्यावसायीक तथा हातावरची मोलमजूरी करुन आपल्या प्रपंचाचा गाडा ओढणारे जे गोरगरीब आहेत त्यांचे लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने त्यांची उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच ज्या लोकांची उत्पन्नाची साधने इतर ठिकाणी गावात किंवा अन्य ठिकाणी इतर भागात असल्यामुळे त्यांना आपल्या कामावर जाता येत नाही. यातील बहूतांश लोक असे आहेत की जे रोज कमवतात आणि खातात आता वीस दिवसांपासून त्यांच्याजवळ जी जमा रकम होती ती ते पुर्णत: खर्च करून बसले आहेत. त्यांच्याकडे इतर दुसरे उत्पन्नाचे काहीच साधन नाही. पण पोटाची भुक शमविण्यासाठी अन्न हे पाहिजेतचना याकरीता त्यांना उसनवारी करावी लागत आहे मात्र शेवटी कुठवर उसनवारी करणार आणि कुठवर कोण उसने पैसे देणार त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत.

सर्वच लोकप्रतिनिधी, नेते जे निवडणुकीकाळात लोकांच्या घरी जाऊन विचारायचे की काही पाहिजे असेल तर सांगा, ते लोकप्रतिनिधी आज कुठे दिसत नाही त्यांनी अशावेळी पुढे आले पाहिजे किंबाहुना प्रत्येक भागातील /वॉर्डातील दानशुर व नगरसेवकांनी मानवसेवा करण्यासाठीची यापेक्षा दुसरी सुवर्णसंधी ती काय असणार आहे. मी एक सामान्य नागरीक या नात्याने या भागातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व दानशूरांना आवाहन करतो की त्यांनी जे लोक रोज काम करून खातात ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत दुसरे कोणते नाही अशा गोरगरीबांना आपण मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवावे असे समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here