श्रीरामपूर – लोकसेवा विकास आघाडी संचलित व नारायणराव रामचंद्र पा. डावखर यांच्या सौजन्याने श्रीरामपूरातील उत्सव मंगल कार्यालय येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या सेंटरचा शुभारंभ प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, डॉ.रविंद्र कुटे, डॉ.रविंद्र जगधने, नारायणराव डावखर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याची माहिती संयोजक रोहन डावखर यांनी दिली.

यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले की, कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींनी घरी न थांबता विलगीकरण कक्षाचा आधार घेऊन उपचार करावे आणि घरातील इतर सदस्यांना वाचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सदर कोविड केअर सेंटरमध्ये 5 एचआरसीटी स्कोअरच्या आतील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर डॉ.रविंद्र कुटे, डॉ.मयुरेश रविंद्र कुटे, डॉ.पूजा हराळे, डॉ.सुमित पुंगळे, डॉ.विनय महाजन यांचे निगराणीखाली मोफत औषध उपचार केले जाणार आहे. तसेच सकाळी व सायंकाळी दोन वेळेस चहा, सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण संयोजकांच्या वतीने मोफत पुरविले जाणार आहे. सदर सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा असणार नाही. तरी ज्या रुग्णांना सदरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यायचे आहे त्यांनी सोबत एचआरसीटी स्कोअर प्रमाणपत्र, आधारकार्ड, जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास व पांघरुन आणावेत.

या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ.इंदुमती डावखर, सौ.पल्लवी डावखर, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुट शिवसेनेचे अशोकराव थोरे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, विजय शिंदे, डॉ.मयुरेश कुटे, डॉ.पूजा हराळे, निरज मुरकुटे, मनसुख चोरडीया, सुर्यकांत डावखर, संदीप डावखर, अमित कोलते, संकेत संचेती, वैभव सुरडकर, वसंत धंदक, मनोज दिवे, सागर कांबळे, रोहित मालकर, सागर काळदंते, शैलेश डावखर, गजेंद्र डावखर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here