श्रीरामपुर/प्रतिनिधी :- एकीकडे कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेले आहे या पार्श्वभूमीवर जरी सर्व बंद असले तरी अनेक गुन्हेगार या लॉकडाऊनचा फायदा घेऊन गुन्हेगारी घटना पूर्णत्वास नेत आहेत अशाच प्रकारे अनेक चैनस्नेचिंगच्या गुन्ह्यातील पोलिसांना हवा असणार सराईत गुन्हेगारास शहर पोलिसांनी गजाआड केल्याची कारवाई केली

आधिक मिळालेल्या माहिती नुसार शहरातील हुसेननगर परिसरातून खबडी परिसरात ॲक्टिवा गाडीवर फिरत असलेला सराईत आरोपी बल्ली उर्फ बलराम रामचित यादव वय वर्ष २५, राहणार सरस्वती कॉलनी वार्ड नं.७ श्रीरामपूर यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता  आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडून एक गावठी कट्टा, एका जिवंत कडतुस व चोरीची ॲक्टिवा मोटारसायकल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, आरोपी विरुद्ध या पाहिले अनेक पोलीस ठाण्यात 10 ते 12 गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात पोलिसाना तो हवा होता आरोपी विरुद्ध श्रीरामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं 248/2021 प्रमाणे  भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर सदर आरोपीने त्याचा साथीदार नईम मेहमुद सय्यद राहणार अचानक नगर वार्ड नं. १ श्रीरामपूर  याच्या सोबत अनेक चैनस्नेचिंगचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास. पो. हे.का.श्री.जोसेफ साळवे हे पो.नि.श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

श्रीरामपूर पोलिसांनी केलेली कारवाई पोलिस अधीक्षक श्री.मनोज पाटील, उपअधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी. संदीप मिटके, पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोहेका.जोसेफ साळवे, पोना.करमल, पोका.किशोर जाधव, पोका. राहुल नरवडे, पोका.राहुल गायकवाड, पोका.पंकज गोसावी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here