अहमदनगर/प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासन कडक लॉकडाउन करतील अशी तरी शक्यता वाटत नाही. कारण आर्थिक घडी रोजगार व्यापारी यांचे हाल असंतोष कोण ओढुन घेणार या कटु अंमलबजावनी साठी कोणी धजावत नाही ही राजकारण करण्याचा टाईम नव्हे पण राज्यांने सर्व जिल्हाधिकारी यांना संपुर्ण अधिकार बहाल केले आहेत  जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रील, मे या महिन्यांची परिस्थिती पहाता महाराष्ट्राबरोबर अहमदनगर जिल्हयाची स्थिती अतिशय बिकट आहे क्षेत्रफलाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासनाचे देखील भंबोरे उडाले आहे या जिल्ह्यात तीन मंत्री जिल्हाधिकारी व त्यांच्या संपूर्ण टिमला 14 तालुके फिरणे अशक्य असल्याने ठरावीक तालुक्याचा आढावा घेतला जात आहे

तरी देखील फारसा फरक पडल्यांचे दिसुन येत नाही बाधीतांची संख्या मृत्यूची संख्या ही अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्राच्या तुलनेत खुप आहे याला पर्याय म्हणून सर्व सामन्यांना आपली बाजु पटवुन देणे कोरोना साखली तोडण्यासाठी 15 मे पासुन 15 दिवसांचा कडक लॉकडाउन अंमलबजावणी करणे हॉस्पिटल, मेडीकल,तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय दुकाने बंद ठेवावेत 7 ते 11 या टाईमात दुकानावर भाजी मार्केटला मोठ्या प्रमाणावर झुबंड उडत आहे पेट्रोल पंप फक्त अँबुलन्सलाचा पाहीजे पोलीसाना पहिल्या लॉकडाउन सारखे अधिकार दिले जावेत तर आणि तरंच साखली तुटणार आहे

जानेवारी 49 फेब्रुवारी 48 मार्च 153 एप्रील 691 आणि मे दोन दिवसात 78 मृत्यू आहेत त्यांच प्रमाणे पुणे नाशिक औरंगाबाद येथील घाटी या ठिकाणी हलवण्यात आले आणि दगावले ती आकडेवारी व पैशाच्या अभावी घरीच अनेक जन मृत्यूमुखी पडले आहेत ही सर्व परिस्थिती पहाता अहमदनगर जिल्हा खरंच लॉकडाउन केला पाहीजे असे माझ्यासह सर्वसामान्य नागरीकांना आता वाटायला लागले आहे  पालकमंत्री हसनजी मुश्रीफ सह तिन्ही मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करुन अहमदनगर जिल्हा संपुर्ण लॉकडाउन करण्याची ही गरज ओळखुन निर्णय घ्यावा असे जिल्हाधिकारी राजेंन्द्र भोसले यांना दिलेल्या परिपत्रकातून भाजपा अनुसुचित जाती मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष अशोक लोंढे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here