श्रीरामपूर/प्रतिनिधी :-तालुक्‍यातील सर्वच लसीकरण केंद्रावर गेल्या दोन आठवड्यापासून कोवॅक्सिन व  कोव्हिशिल्ड या दोन्ही लसीचा तुटवडा आहे. शासनाने कोवॅक्सिन व कोव्हिशिल्ड ही लस त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने केली जात आहे. शासनाने लसीकरण मोहिम हाती घेतल्यानंतर सुरुवातीला नागरिकांमधून कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.

मात्र, जनजागृतीनंतर नागरिकांमधून उत्साहाने लसीकरण केले जाऊ लागले. श्रीरामपुर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस उपलब्धतेनुसार नागरिकांना दिल्या गेल्या. मात्र कोवॅक्सिन व कोव्हिशिल्ड या लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना ४५ दिवस उलटूनही दुसरा डोस मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. शासन एकीकडे लसीकरण करण्यासाठी जनजागृती करत असताना दुसरीकडे मात्र लसींचा जाणवणारा तुटवडा नागरिकांच्या जिवाशी खेळणारा ठरत आहे.

दोन डोसमधले अंतर संपूनही दुसरा डोस वेळेत मिळत नसल्याने सकाळपासून लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहूनही लसीअभावी माघारी फिरण्याची वेळ अनेकदा नागरिकांवर येते. तालुक्यातील सहाही उपकेंद्र अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, आज कोवॅक्सिन लसीचे २०० डोस उपलब्ध झाले होते. यावेळी पाचशेहुन अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थपणाने लस संपली असे सांगून उर्वरित अनेक नागरिकांना हात हलवीत माघारी परतावे लागले. परंतु मनसेचे पदाधिकाऱ्यांच्या असे काही निदर्शनात आले की काही गाव चालवणारे व गावातील पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांना रुग्णालयात वेगळी वागणुक देऊन त्यांना लस देण्यात आली अशी काही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर  आम्ही चर्चा केली असतात त्यांनी सांगितले ते व्हीआयपी असून त्यांच्यासाठी राखीव लस ठेवण्यात आलेले आहे परंतु आमचे असे म्हणणे आहे की असे न करता सर्व व्यक्तींना  समान न्याय द्यावा हीच आमची इच्छा आहे तसे न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मनसे जिल्हासचिव तुषार बोबडे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here