श्रीरामपूर – शहरातील मेनरोड वरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्स गच्चीवरून पडून युवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अभिजीत दिपक सुखदरे,वय-२५ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडल्याचे समजते. अभिजित हा लॅाकडाऊन असल्यामुळे त्याच्या मित्रांसह मेन रोड भागातील साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्स च्या समोरील मोकळ्या पटांगणात क्रिकेट खेळत होता. त्यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पेट्रोलिंग वरच्या पथकाने त्यांना क्रिकेट खेळू नका असे सांगितले व पोलीस त्यांच्या मागे लागले म्हणून हे तरुण तेथून पळून गेले परंतू अभिजित हा साई सुपर मार्केट च्या गच्ची वर जाण्यासाठी जिन्याने वरती गेला आणि चवथ्या मजल्यावरून त्याचा तोल जाऊन तो कॉम्प्लेक्स च्या वरील पत्र्यातुन थेट खाली फरशीवर पडला असे त्याच्या सोबत असणार्या मित्रांनी सांगितले.            

             अभिजित पडल्याचे लक्षात येताच आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी ॲम्बुलन्सला संपर्क केला तब्बल अर्धा तास उशिराने ॲम्बुलन्स आली व अभिजीत याला ॲम्बुलन्स मध्ये टाकून साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टर जगधने यांनी त्याला तपासले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. एकीकडे शहरात ठराविक भागात लोक मास्क घालत नाही ,गर्दी करतात त्याच्यावर पोलीस काही कारवाई करत नाही पण दुसरीकडे पोलीस मागे लागल्याने पोलीसांपासुन बचाव करण्याच्या नादात माझ्या भावाचा बळी गेला असा आरोप सुजीत सुखदरे यांनी केला आहे.

          या घटनेने श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ माजली आहे आणि हा श्रीरामपूर शहरातला लॅाकडाऊनचा दुसरा बळी असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप हे तात्काळ हजर झाले होते. तसेच माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे हे देखील यावेळी उपस्थित होते.

            अभिजीत हा तरुण गणेश उत्सव ,नवरात्र उत्सव तसेच इतर धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होता. या घटनेने त्याच्या मित्र वर्गात तसेच शहर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here