नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वायुनंदन जय हरी कोविड सेंटरला भेट दिली .
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी वायुनंदन परिवार जय हरी बहुउद्देशीय महीला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माका येथे सुरु करण्यात आलेल्या जय हरी वायुनंदन आरोग्य मंदिर कोवीड केअर सेंटरमध्ये  माजी आ. बाळासाहेब मुरकुटे व वायूनंदन परिवाराचे सर्वेसर्वा सुभाष औटी यांनी भेट दिली.या वेळी त्यांनी कोरोनाबाधिताशी चर्चा केली.त्याच्या जेवणाची व्यवस्था आरोग्य इतर विषयावर चर्चा करून काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य प्रमाणे सल्ला ही दिला. माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट दिल्याने सर्वांनी मनसोक्त गप्पा देखील मारल्या.आज  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रथमच सुरू झालेल्या या कोविड सेंटरमध्ये रुग्णाची संख्या वाढत आहे.त्यामुळे रुग्णाना  सुविधा व्यवस्थित मिळता की नाही याची पाहणी देखील करण्यात आली व सूचना देण्यात आल्या.

कुठलीही सत्ता हातात नसतांना माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या या कोविड रुग्णासाठी वरदान ठरत आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नितीन दिनकर, शहर अध्यक्ष मनोज पारखे, विवेक नन्नवरे, मनोज डहाळे, सचिन नागपुरे,संदीप जाधव,अमोल कोलते,अजित नरूला, स्वप्निल मापरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here