श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरात काल साई सुपर मार्केट या मेन रोडवर असलेल्या मोठ्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून अभिजीत सुखदरे हा तरुण तोल जाऊन पडल्याने मृत्यूमुखी झाला होता. त्यावेळी त्याचे भाऊ श्री.सुजित सुखदरे यांनी अभिजीत याच्यामागे पोलीस लागले होते आणि पोलिसां पासून बचाव करण्याच्या गडबडीत अभिजीत इमारतीच्या वरुन पडला असा आरोप केला होता. त्या आरोपाच्या अनुषंगाने श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री. संदीप मिटके यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली असुन साई सुपर मार्केट परिसरातील चार सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली आहे. त्यामध्ये पोलीस साई सुपर मार्केट च्या समोर असलेल्या नियम तोडणाऱ्या तरुणांवर कारवाई करून पावती फाडतांना दिसत आहे. परंतु अभिजीत सुखदरे याच्या मागे पोलीस लागल्याचे कुठेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत नसल्याचे श्री. मिटके यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद करण्यात आला असून त्याची पुढील चौकशी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत