संगमनेर/प्रतिनिधी :- शहरात काल लॉकडाऊनचे कालावधीत पोलीस आपले कर्तव्य पार पाडुन कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे म्हणून नागरीकांना गर्दी करु नये म्हणून आवाहन करत असतांना काही समाज कंटकांनी कायद्याच्या रक्षकांवरच भ्याड हल्ला केला, या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.
मागच्या ‘लॉकडाऊनच्या कालावधी पासून ते आजतगयात काही विशिष्ट समाजाचे समाज कंटकच पोलिस प्रशासनाला टारगेट करुन हल्ला करत आहेत. याचा देखील पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन असे समाज कंटक ज्या भागात मोठ्या प्रमाणात राहतात त्या भागामध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेऊन कोरोना नियमाचे पालन करण्यास भाग पाडावे व खाकी वर्दीचे वचक सतत या लोकांनावर राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. या समाज कंटकांना पोलीसांना मारहाण करण्यापूर्वी विचार करायला हवा पाहीजे होता की पोलीस हे नागरीकांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. प्रत्येक नागरीकाला अडचण येते त्याचवेळेस प्रथम पोलीसांकडे जावुनच मदत मागत असताना व पोलीस आहे म्हणनूच आपल्या आया-बहीणींची इज़्त व समाज देखील सुरक्षीत आहे याचे भान कदाचीत संगमनेर येथील या समाज कंटकांना राहीलेले नसेल म्हणून पोलीसांवर हल्ला करणाऱ्या या लोकांवर मोका अंतर्गत कारवाई करुन यांना कडक शासन करण्यात यावे जेणे करुन यापुढे पोलीस बांधवांवर असे हल्ले होणार नाही. यापुढे जर कुठल्याही समाज कंटकांनी पोलीसांवर हल्ला केल्यास सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचे आदेशाने महाराष्ट्र पोलीस विरोधी लोकांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असे निवेदनात म्हटले आहे

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हासचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, शहराध्यक्ष मनविसे विशाल शिरसाठ यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते