श्रीरामपुर/प्रतिनिधी :- सध्या भारतात कोरोना या आजाराचा उद्रेक झाला असून याला बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही ह्रदयद्रावक आहे. अश्या परिस्थितीत माणुसकी म्हणून शक्य तितकी मदत गरजवंताला करणे अपेक्षित असताना काही विक्षिप्त प्रवृत्तीची माणसं या परिस्थितीला पैसे कमविण्याचे साधन या दृष्टिकोनातून बघत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील एका दूध विक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला सदर व्यक्तीला एक मुलगा असून तो सैन्यात काम करतो. तर ह्या दुधविक्रेत्याची श्रीरामपूर शहरातील एका नगरसेवकाकडे दुधाची जवळ जवळ २ लाखाची थकबाकी राहिली होती. त्याची विचारणा त्या मृत व्यक्तीच्या मुलाने केली असता त्या नगरसेवकाकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्याच्या म्हणण्यानुसार त्या मृत व्यक्तीने नगरसेवकाकडून जवळ जवळ ५ लाखाची रक्कम व्याज तत्वावर घेतली होती

त्यामुळे दुधाचे २ लाख रुपये वजा करून उरलेले ३ लाख रुपये त्वरित देण्याची उलटमागणी ह्या नगरसेवकाने त्या मृताच्या मुलाकडे केली. मात्र इतक्या मोठ्या व्याजाच्या रकमेची कुठल्याच कागदोपत्री नोंद नाही शिवाय त्या मृत व्यक्तीला इतक्या रकमेची कधी गरजच नव्हती तरीही केवळ ती व्यक्ती मृत पावली आहे ह्याचा गैरफायदा घेऊन त्या मृताच्या कटुंबावर दमदाटी करून नसलेल्या व्याजाचे पैसे उकळण्याचा गलिच्छ प्रकार आणि ते ही एका प्रतिष्ठित नगरसेवकाडून करण्यात येत आहे. तसेच एका गुरांच्या चाऱ्याच्या कंत्राटदाराने देखील ह्या परिस्थिती चा फायदा घेऊन ह्याच कटुंबाकडून चाऱ्याचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला मात्र मृत व्यक्तीच्या डायरीमध्ये केवळ चालू महिन्याचे बिल बाकी असल्याची नोंद आहे. अश्याप्रकारे कोरोनाग्रस्त मृतांच्या कटुंबाला फसवून , दमदाटी करून पैसे कमविण्याचा हा विकृत मार्ग काही लोक अवलंबित आहेत. ही घटना फक्त उघडकीस आली मात्र अश्या अनेक घटना सध्या राजरोसपणे घडत आहे. ” या घटनांवर तत्काळ लगाम लावण्यात यावी अन्यथा अशी फसवणूक करणाऱ्यांना आपल्या पद्धतीने जश्यास तसे उत्तर देण्यात येईल ” अश्या स्वरूपाची आक्रमक भूमिका भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री.विशाल यादव यांनी घेतली असून श्रीरामपूर प्रशासनाने ह्या कोरोनाग्रस्त मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या महाभागांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी याठिकाणी त्यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here