श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा (अहिल्यादेवी नगर) या शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती लता दत्तात्रय औटी उर्फ सौ. लता पोपटराव वाघचौरे मॅडम यांनी पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराचे 30 रोजे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीरीत्या पूर्ण केले.याबद्दल समाजाच्या सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यासंदर्भात सौ .लताबाई वाघचौरे यांना विचारले असता मी पूर्वीपासून दरवर्षी रमजान महिन्यातील रोजे धरीत असते. यापूर्वी पंधरा-सोळा रोजे पर्यंत झाले होते. मात्र गेल्या वर्षी मनाचा निश्चय केला आणि पूर्ण महिनाभराचे रोजे पूर्ण झाले. या वर्षी सुद्धा मी निश्चय केला होता व त्या प्रमाणे मी पूर्ण रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केले . रोजे धरणे मला लहानपणापासून  मनापासून आवडते. हे रोजे  धरल्यामुळे मला एकदम फ्रेश वाटत आहे असे ही त्यांनी सांगितले. यावर्षी एवढा कडक उन्हाळा असताना सुद्धा तुम्ही सर्व रोजे  कसे पूर्ण केले असे विचारले असता एकदा मनाचा निश्चय केला की अशक्य काही नाही असे त्यांनी सांगितले.रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच रोजा इफ्तार व सहेरी चे वेळापत्रक आपण प्राप्त केले होते आणि त्यानुसार वेळेचे पालन करीत हे रोजे पूर्ण केले. वाकचौरे मॅडम यांनी रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, नगरसेविका सौ समीनाभाभी शेख,नगरसेविका जायदाबी कुरेशी, नगरसेवक ताराचंद रणदिवे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण, किशोर शिंदे , दिलीप विळस्कर,सय्यद असलमभाई,उर्दू शाळा क्रमांक चार, पाच व नऊ च्या सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

मागील वर्षी पूर्ण महिनाभर रोजे ठेवले होते. त्याचा मला असा फायदा झाला कि मला करोना झाला त्यातुन मी पूर्ण पणे बरी झाली. त्याचा मला फारसा त्रास झाला नाही. या वर्षी परिस्थिती बदलली. करोनाचे सावट असताना मी अत्यंत विश्वासाने व धैर्याने रोजे ठेवले व ते यशस्वी रित्या पूर्ण केले,कारण मला रोजे केल्याचे फायदे काय आहे हे माहित होते. रोजे ठेवण्या मागे जसा धर्माचा आधार आहे तसा शास्त्रीय आधार आहे. पूर्ण 14-15 तास शरीरात अन्न व पाणी कशाचे ही सेवन न केल्या मुळे शरीरातील पचनशक्तीला आराम मिळतो. प्रतिकार शक्ती वाढते. माझी दररोज spo2 तपासला असतात तो 98-99 % असत. शरीरातील सर्व पेशीना कार्य करण्यासाठी उत्तेजाना मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. सहनशिलता वाढते. आपण जर आजारी पडलो तर आपले शरीर अन्न घेत नसते म्हणजे शरीराला पण उपवासाची गरज असते.रोजे ठेवल्या मुळे असाध्य अशा आजाराना सुद्धा फायदा होतो. आपल्याला भुकेचे महत्वा पण कळते. हे उपवास करण्यासाठी माझे पती श्री पोपटराव वाघचौरे सर, मुलगा श्री डॉ गणेश व सून सौ डॉ रचना याचे सहकार्य मिळाले. श्री सलीम सर याचे मार्गदर्शन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here