श्रीरामपुर/प्रतिनिधी  -श्रीरामपुर शहरात उभारण्यात आलेल्या स्व. जयंतराव ससाणे या कोविड सेंटरमधील करोनाबाधितांना अक्षयतृतीया निमित्त आंबारसाचे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ व युवक कॉग्रेस  ने अक्षयतृतीये निमित्त आंबरस, पुरी, भाजी, वरण, भात, कुरडई, पापडचे मिष्टान्न भोजनाचे अतिशय स्वच्छ जेवण बाधितांना कोविड सेंटर मध्ये देण्यात आले.

स्व. जयंतराव ससाणे येथे बाधित, मेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि पुढच्या फळीत काम करणाऱ्या सगळ्या सेवकांनाही हे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

यावेळी स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ व युवक कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here