माळवाडगांव | वार्ताहर :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने माळवाडगांव मधील सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा नसणा-या करोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली.
          येथील कोविड सेंटरचे उद्घाटन श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते तर सरपंच बाबासाहेब चिडे,चेअरमन गिरीधर आसने,आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सोहेल शेख,पोलीस पाटील संजय आदिक,डॉ कैलास सैंदोरे,मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
          या कोविड सेंटरसाठी सरपंच बाबासाहेब चिडे यांनी लक्ष्मी माता मिल्कच्या माध्यमातून १५ बेडची व्यवस्था केली असून महिलांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. यामध्ये २४ तास वीज पुरवठा, फॅन, विश्रांतीसाठी बेड, पिण्याचे शुद्ध पाणी, गरम पाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा बरोबरच खाजगी सेवा देणारे गावातील डॉक्टर्स यांचे मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.रुग्णांसाठी सरपंच बाबासाहेब चिडे व माळवाडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधांबरोबरच चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर भोजनाची व्यवस्था मात्र रुग्णांच्या नातेवाइकांनी डबा पद्धतीने करायची आहे.
     आपला गाव आपला तालुका सुरक्षित ठेवायचा असेल तर नागरिकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावे तसेच घरी उपचार घेत असणा-या बाधीतांनी स्वयंस्फूर्तीने कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.
      या उद्घाटन प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोखंडे सिस्टर,आशा सेविका अर्चना आसने,राजश्री गायकवाड,कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल,नामदेव म्हस्के,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे,संजय आसने,नानासाहेब आसने,अनिल आसने,सागर आसने,सतीश आसने,श्रीकांत दळे,डॉ इलियास पठाण,दिगंबर आढाव,प्रसाद जगरूपे,दत्तात्रय दले, बबन आसने,राजेंद्र आसने,विक्रम कहाडळ,सुनीता तोडमल,मारिया साळवे,संगीता साळवे,स्वाती बोबडे,अनिल आसने,संजय आसने,पत्रकार विठ्ठलराव आसने,भाऊसाहेब काळे,संदिप आसने,इम्रान शेख,रवींद्र आसने यासह आदी उपस्थित होते.
         यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी आशा सेविका व पोलीस पाटील यांना कोरोना पासून बचाव होण्यासाठी सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या हस्ते फेश शिल्डचे वाटप करण्यात आले.

आपल्या गावातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे तसेच श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने आपल्या गावात कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे गावातील सर्व नागरिकांनी गट-तट विसरून कोरोणा महामारीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन माळवाडगावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here