श्रीरामपूर : यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असून पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींची जुळवणूक करण्यासाठी शेतकरी बांधव तयारीला लागला आहे, परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे हि बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे.
श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे व आमदार लहू कानडे यांना पत्र लिहुन केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. तरी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खतांची ही दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पत्रात डॉ. मुरकुटे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here