सुखदान यांच्या प्रयत्नांना यश

नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) – मनासारखा राजा राजा सारखे मनं या म्हणी ला साजेल अशी घटना नेवासा फाटा येथे घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते व वंचीत बहुजन आघाडीचे युवा नेते संजय सुखदान यांनी आज नेवासा फाटा येथील माऊली सिटी स्कॅन सेंटर ला भेट दिली.

सध्या करोना महामारी मध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना सिटी स्कॅन करणे गरजेचे आहे मात्र काही गोरगरीब रुग्णांन कडे पुरेसे पैसे नसल्याने सिटी स्कॅन साठी लागणारें २५०० रुपयांची फि कमी करावी व रुग्णांना सहकार्य करावे अशी मागणी सुखदान यांनी माऊली सिटी स्कॅन चें संचालक डॉ रविंद्र काळे यांच्या कडे केली.
या वेळी  कुठला ही विचार न करता काही क्षणातं तब्बल ५०० रुपये कमी करून २००० रुपये इतकी तपासणीसाठी फी घेऊ असे आश्वासन काळे यांनी दिले. यावेळी संजय सुखदान मुन्ना शेख,  ऋषीकेश कोकणे, यांनी डॉ काळे यांचे आभार मानले. 

“डॉ काळे यांच्या रुपात माणुसकी चें दर्शन घडले तत्काळ कुठला ही विचार न करता आमची मागणी मान्य केली संत ज्ञानेश्वर माऊली च्या गावांत माऊली सिटी स्कॅन चें संचालक डॉ रवींद्र काळे यांच्या मनाचा मोठे पणा अनुभवला” – संजय सुखदान, युवा नेते. 

“आज खऱ्या अर्थाने संजू भाऊ( नाना) सुखदान यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तसेच तालुक्यातील गरजू पॉझिटिव्ह रुग्णांना सिटी स्कॅन साठी आर्थिक मदत लागल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा तसेच डॉ काळे यांचे आभार वेक्त करतो. – मुन्ना शेख, सामाजिक कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here