श्रीरामपुर(वार्ताहर)-श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत शासकीय कोरोना प्रतिबंध लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर  माननीय प्रांतअधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता ,असे लक्षात आले की माननीय नगराध्यक्षा यांचे वाहन चालक श्री नियाज शेख यांनी खंडागळे नावाच्या व्यक्तीस नगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीत नाव नसताना सुद्धा व प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेत असताना. रांग मोडून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून लस देण्यास भाग पाडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाने, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे ,सुहास परदेशी यांनी या यादीत नाव नसलेल्या व्यक्तीच्या लसीकरणास हरकत घेतली. त्यानंतर मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे सुद्धा घटनास्थळी आले व त्यांनाही खंडागळे नावाच्या व्यक्तीचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत नसल्याची खात्री पटली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांतअधिकारी यांच्याकडे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून 353 ,34 नुसार कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.हा सगळा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here