श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर शहरात कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले होते अशा परिस्थितीत बेड शिल्लक नाही ऑक्सिजन नाही असे कारण सांगून अनेक रुग्ण अहमदनगर औरंगाबाद सह अनेक ठिकाणी हलवण्यात आले होते परंतु याला एक अपवाद म्हणजे साई शितल कोविड सेंटरला गेलेला प्रत्येक रुग्ण हा शंभर टक्के बरा होऊन बाहेर येत होता

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी साई शितल कोविड सेंटर असल्याने त्यामधील डॉ मच्छिंद्र त्रिभुवन यांनी व त्यांच्या टीमने रुग्णाची मनापासुन सेवा करीत होते म्हणून त्यांचा गौरव हा समाजाच्या वतीने करावा ही सामाजिक बांधिलकी जाणून व त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे वतीने डॉ मच्छिंद्र त्रिभुवन यांच्या सह संपूर्ण सहकार्याचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला

यावेळी सामाजिक कार्यकर्ते लहानू त्रिभुवन, नगसेवक किरण लुनिया, डॉ मुकुंद शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष पुष्पलता हरदास, सौ किरण सोनवणे, मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, बाळासाहेब हरदास, विशाल हरदास आदी पदाधिकारी उपस्थित होते

श्रीरामपुर तालुक्यातील हे एकमेव सेंटर आहे जेथे सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशा डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण टीमचे कुठेतरी कौतुक व्हावे यासाठी त्यांचा सत्कार करून त्यांचे मनोधैर्य वाढावे हीच एक अपेक्षा :- भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here