श्रीरामपूर शहरामधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दत्तनगर गावातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार से. सह. पतसंस्था या संस्थेच्या चेअरमन सहित अन्य संचालक यांनी लाखो रुपये इतर ॲडव्हान्स  म्हणूण उचलेले होते.

याबाबत संचालक शांतीलाल सोनवणे हे  वारंवार उचलेले पैसे भरण्यासाठी मासिक मीटिंग मध्ये आवाज उठवला होता परंतु कोणी ही दाद देत नसल्याने अखेर सोनवणे यांनी संचालक पदाचा राजीनामा देत मा. सहाय्यक निंबधक  सहकारी संस्था श्रीरामपूर यांच्या कडे तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत सहाय्यक निंबधक साहेब यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम कलम 83 अन्वये चौकशी आदेश पारित करीत श्री आरणे  यांची नेमणूक केली होती त्यानी या प्रकरणाची चौकशी करून त्या आदेश मध्ये चेअरमन सहित चार संचालक दोषी दाखवले होते त्यांना उचल केलेली रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती परंतु त्याची पूर्तता न केल्याने संस्थेचे चेअरमन बाळासाहेब विघे, अनिल जेधे. मिनाबई चावरे, शोभाबाई बग्गन याना संचालक पदावरून निष्प्रभवित केल्याचा आदेश पारित केला  सदर प्रकरणी टिळकनगर, दत्तनगर परिसराचे लक्ष लागून होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here