टाकळीभानच्या अन्नछत्रालयास राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिली भेट

टाकळीभान (प्रतिनिधी) गेल्या ३० दिवसांपासून टाकळीभानला नवाज शेख व नारायण काळे या युवकांनी सुरु केलेल्या अविरत अन्नछत्रालयाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी त्यांचेसोबत प्रहारचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार,जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,जिल्हा संघटक कृष्णा सातपुते,ज्ञानेश्वर सांगळे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की,कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात नवाज शेख व नारायण काळे यांनी सुरु केलेले अन्नछत्रालय गरजूंची भुक भागवणारे तिर्थक्षेत्र झाले आहे.आतापर्यंत २८ हजार गरजूंना झालेले अन्नदान खर्‍या अर्थाने पुण्याचे काम आहे.नवाज शेख व नारायण काळे आजच्या काळातील खरे कोरोनायोद्धे व अन्नदाते आहेत.

यावेळी प्रहारचे तालुका संघटक डाॅ.किसन शिंगोटे,युवक तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे, शहराध्यक्ष सागर दुपाटी, अकील शेख, बाळासाहेब ढंगारे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सागर धोत्रे, ऋषी धोंडलकर, मुकुंद लोखंडे, अक्षय थोरात, सुहास वखरे, जिजाराम जाधव, बंटी मगर, गुरुनाथ चव्हाण, रमेश पेहेरकर, भोकरचे रमेश भालके,कैलास चव्हाण, नानासाहेब तागड, दिपक पटारे आदि उपस्थित होते.

राज्यमंत्री बच्चू कडू खास टाकळीभानच्या अन्नछत्रालयाला भेट देण्यासाठी मुंबईवरुन बाय कार आले.पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आल्याने बच्चू कडू टाकळीभानवरुन पुन्हा मुंबईला रवाना झाले.आपल्या कार्यकर्त्याच्या उपक्रमाला भेट देण्यासाठी स्वतः मंत्री ६५० किमी प्रवास करुन येतात हे बच्चूभाऊंची कार्यकर्त्यांप्रती असलेली संवेदना दाखवते. नवाज  शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here