श्रीरामपुर :-कोरोनामुळे जग संकटात सापडले आहे. आपल्या संपूर्ण देशामध्ये सध्या लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून पोलिस बांधव आपले संरक्षण करत आहेत. हे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर च्या वतीने  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व पोलिस निरीक्षक संजय सानप पोलीस उपनिरीक्षक  घायवट यांच्या प्रमुख उपस्थिती व मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप यांच्या असते श्रीरामपूर शहरातील सर्व पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले

त्याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, मनविसे शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, जिल्हा सचिव डॉ संजय नवथर,  तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, मनविसे तालुका अध्यक्ष राहुल दातीर, आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here