श्रीरामपुर(प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपुर तालुक्यात करोना रुग्णांची वाढती लोकसंख्या असुनही नागरिकांच गांभीर्याचे वातावरण दिसुन येत नाही,सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे
राज्य सरकारने एकिकङे बाजार समितीच्या आवारात गर्दि करण्यास मनाई केली असली तरी नागरिक बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर आपले दुकान लावुन गर्दि करत आहे पहाटे त्यांच्यावर लक्ष ठेवायला व गर्दि कमी करण्यासाठी सांगायला संबधित कुणिच नसते अनेक ठिकाणी भाजिपाला विक्रेते आणि ग्राहक विनामास्क असतात
श्रीरामपुर बाजार समितीच्या बाहेर पहाट आज भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची एक झुंबड उडाली हि गर्दी दररोज होत आहे मार्केट बाहेर विक्रेत्यांचे दुकाने रस्त्याच्या कङेला लावली होती ग्राहकांची संख्या थोडी जरी वाढली तरीही या भागात कोंडी होती सुरक्षित अंतर राखण्याचा नियमाकडेही नागरिकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. काही विक्रेते रांगेत या, असे सांगत होते, परंतु त्याकडे ग्राहक लक्ष देत नव्हते. उलट ग्राहक खरेदीसाठी घाईगडबड करत असल्यामुळे बाजारात एकच गोंधळ दिसून येत होता. काही ग्राहक लवकर भाजीपाला द्या यासाठी आग्रह धरत होते नगरपालीका प्रशासन व पोलिसांनी या कङे लक्ष द्यावे अशी मागणी अनेकजण नागरिक करत होते
देशात सर्वाधिक करोना रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात होत आहे राज्यात करोनाची दुसरी लाट आहे मात्र अनेकजण निष्काळजीपणे वागताना दिसत आहे