श्रीरामपुर/प्रतिनिधी : मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे घरी जात होते. त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी चौकात सापडलेला 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

बाबा शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी गोंधवणी या ठिकाणी त्यांचे घर आहे तेथे घरी जाताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या रस्त्यामध्ये मोबाईल सापडला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या मोबाईलवर रविंद्र मगर यांचा फोन आला की संध्याकाळी  मी मोटारसाईकलवरुन संगमनेर रोडणे घरी जात असताना माझ्या नाईट पॅन्ट च्या खिशातून  मोबाईल रस्त्यात पडला आहे. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना सांगितले आहे. तुमचा मोबाईल मला सापडला आहे. काही काळजी करु नका. राधिका हॉटेल शेजारी माझे ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन  तुमचा मोबाईल घेऊन जा असे सांगितले. रात्री आठच्या सुमारास रविंद्र मगर याठिकाणी आल्यानंतर बाबा शिंदे यांनी त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी रवींद्र मगर व त्यांच्या घरच्यांनी बाबा शिंदे यांची आभार मानले. त्याप्रसंगी मनसे तालुका प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here