माळवाडगाव (प्रतिनिधी संदिप आसने) श्रीरामपूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगीराज सदगुरु गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र सरला बेट या संस्थांनने “लेने को हरिनाम, देने को अन्नदान” या उक्तीप्रमाणे कोरोना रुग्णांसाठी पुढाकार घेतला असून विविध ठिकाणी सरला बेट संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मधुकर महाराज यांच्यामार्फत मदत कार्य देखील सुरू आहे.
          श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, महांकाळ वाडगाव, सरला,गोवर्धन या गावातील कोरोणा रुग्णांची ने-आण करण्यासाठी माळेवाडी येथील कोविड केअर सेंटरला श्रीक्षेत्र सरला बेट संस्थांनने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली तर अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी मोफत अन्नदान करण्यात आले आहे.
        जगात करोनाने थैमान घातले आहे. यातून काहींना आपले प्राण गमवावे लागले. मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशा संकटाच्या काळात आपण एकजूट दाखवून एकमेकांच्या उपयोगी पडण्याची ही वेळ आहे. गोरगरिबांना आधार देण्याची गरज असल्याचे सांगून महंत रामगिरी महाराज म्हणाले, हा संसर्गजन्य आजार आहे. खरे तर प्रत्येकाने कोरोना सारखा आजार होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. काम असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. पोलीस बांधव तसेच इतर शासकिय यंत्रणा करोनाचे प्रमाण कमी होण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात सर्वच मंडळींनी करोना केअर सेंटर उभारले. ही चांगली गोष्ट आहे. समाजही यासाठी देणगी रुपाने मदत करत आहे. माणुसकीच्या भावनेने सर्वच मदत करत आहेत. मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे. समाजातील गरजुंना आधार द्या, माणुसकी जपा, असेही महंत रामगिरी महाराज यावेळी म्हणाले. देशातील का नाहीसा होण्यासाठी आपण सद्गुरू गंगागिरी महाराज, सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतों, असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.
      यावेळी सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ,व्हा.चेअरमन पोपटराव जाधव,निरज मुरकुटे,कारेगाव भागचे संचालक नारायण बडाख,मा.चेअरमन भाऊसाहेब चोरमल,रमेश आढाव,कापसे,डॉ मंगेश उंडे,डॉ कल्याणी झाडे,डॉ वैभव उंडे,डॉ शामल उंडे,दुशिंग सिस्टर,रामनाथ शिंदे,भाऊसाहेब महाराज, सुदाम महाराज यासह आदी यावेळी उपस्थित होते.

ज्या कोविड सेंटरला रुग्णांना जेवणाची आवश्यकता असेल त्याठिकाणी श्रीक्षेत्र सरला बेट संस्थान मार्फत सर्व रुग्णांसाठी मोफत जेवण देखील पुरविण्याची तयारी सरलाबेट संस्थांनची आहे.तरी देखील ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्यांनी सरला बेट संस्थांनशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थांनचे महंत रामगिरीजी महाराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here