जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहरातील मेहरूण तलाव बगीचा परिसरात असणाऱ्या एका मोठ्या विहिरीत २४ वर्षीय तरुणाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून आजूबाजूच्या लोकांच्या हे ध्यानात आल्यानंतर घटनास्थळी पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून तरुणाचा विहिरीत शोध घेण्याचे काम सुरु होते  . मात्र एक  तासांच्या प्रयत्नांनंतर शेख रफिक शेख रहीम आणि सहकारी पोहणाऱ्यांनी मयत तरुणाचा मृतदेह शोधून काढला .
मयत तरुण हा मेहरूण परिसरातील अशोक किराणा परिसरातील  इम्रान खान अकील खान वय २४ असे तरुणाचे नाव समजून येत असून बघ्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. . प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सांगितले कि, त्याला डोकेदुखीचा आजार असल्याने त्याने या आजाराला कंटाळून साडेतीन वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची  माहिती सूत्रांनी दिली . घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. मयताच्या मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here