श्रीरामपूर- कोरोना काळात सामान्य रुग्णांची अनेक कोविंड सेंटर हॉस्पिटल आर्थिक लूट करत असतील तर गाठ आमच्याशी आहे, आपल्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊन लूट करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आम आदमी पार्टीचे  उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल  यांनी दिला…
गेल्या दीड वर्षांपासून समस्त जनता कोरोना महामारीने त्रस्त असताना. अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले तर अनेक कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे या महामारीमध्ये, मृत्यू पावले.अश्यातच कोविड च्या आजारावर उपचार मिळवण्यासाठी लोक हे वन वन फिरत आपल्या रुग्णाला चांगली आरोग्यसुविधा मिळावी या उद्देशाने प्रयत्न करत असतात,परंतु मात्र खाजगी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आपचे तिलक डुंगरवाल यांनी केलाय.नाशिक येते हॉस्पिटल मध्ये लुटमारीच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करून सर्वसामान्य वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे आम आदमी पार्टी चे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत डुंगरवाल बोलत होते.या वेळी भावे यांनी खाजगी रुग्णालयात कश्या प्रकारे रुग्णाची आर्थिक लूट होते या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच ज्यांचे जादा बिल आकारणी आहे त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा, व नागरिकांना या पासून प्रत्येकाने कसे वाचावे या बाबत मार्गदर्शन जितेंद्र भावे यांनी केले,
येत्या काळात जर रुगणांची आर्थिक लूट थांबली नाही तर या खाजगी रुग्णालयांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडू असा इशारा आम आदमी पार्टी चे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी दिला आहे. तसेच हॉस्पिटल मधून ज्यांच्याकडून जास्त बिल आकारले आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन  विकास डेंगळे यांनी यावेळी केले या बैठकीत तालुका अध्यक्ष विकास डेंगळे,जिल्हा प्रवक्ते  प्रवीण जमदाडे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे शहराध्यक्ष किशोर वाडीले, भरत डेंगळे,  राहुल केदार, किरण गायकवाड  दीपक परदेशी ,किरण डेंगळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here