श्रीरामपूर(प्रतिनिधी)- कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची असल्यास लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी मोरया फाऊंडेशन आयोजित लसीकरण नोंदणी अभियान शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, विवेक तांबे, विजय पाटील, राहुल रुपनर, तुषार कडूस्कर, किशोर झिंजाड, हर्षल गौड, शाम तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खोरे म्हणाल्या की, श्रीरामपूर नगरपरिषदेने कोरोना लसीकरण ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. प्रभागातील नागरिकांना सुलभतेने नोंदणी करता यावी म्हणून मोरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे मार्गदर्शनाखाली हे कोरोना लसीकरण आपल्या दारी या अभियान सुरू करण्यात आली आहे. केंद्र, राज्य सरकारने लस उपलब्ध करून दिल्यास प्रभागातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेऊन स्वखर्चाने प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याचे खोरे यांनी सांगितले. सर्व नागरिकांनी लसीकरण करावी असे आवाहन यावेळी मोरया फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
कोरोना लसीकरण आपल्या दारी हे अभियान प्रभाग क्र.१६ मधील बेलापूर रोड, मसाला गल्ली, थत्ते मैदान, पूर्णवाद नगर, पटेल हायस्कुल परिसर, लबडे वस्ती, रामचंद्र नगर, विद्या हौसिंग सोसायटी, काच मंदिर परिसर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर रोड, लक्ष्मी आई रोड, अंध शाळा परिसर, इंद्रप्रस्थ कॉलनी, गौतम नगर, भोंगळ वस्ती, मुळा प्रवरा रोड परिसरातील एक हजारहून अधिक नागरिकांनी पहिल्याच दिवशी नोंदणी केल्याने नगरपरिषद प्रशासनाला खोरेंमुळे मोठा आधार मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here