वादळी पावसाने उडविली दैना… घराचे पत्रे उडाले ५०० फूट लांब

माळवाडगांव (प्रतिनिधी संदिप आसने)
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील उत्तम थोरात, बाळासाहेब बाबुराव आदिक,भानुदास गाढे यांच्या घराचे पत्रे उडून ५०० फूट लांब दुसऱ्यांच्या शेतात जाऊन पडले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही, अगोदरच कोरोनाचे संकट, त्यात लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीत छतही वादळाने राहिले नसल्याने अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.खानापूरसह परिसरात शनिवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरशः दैना उडविली असून खानापूर व परिसरातील विविध भागात अनेक नागरिकांचे घराचे पत्रे उडाले काही ठिकाणी झाडे पडली तर काही नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
        तालुक्यातील खानापूर येथील उत्तम दौलत थोरात,बाळासाहेब बाबुराव आदिक, अशोक दगडू पंडित,भानुदास गाढे, भाऊसाहेब बाबुराव जोर्वेकर,वसंत गायकवाड, भामाठाण येथील आरिफ शेख यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून जाऊन १ लाख हजार १० रुपयांचे नुकसान झाले. याबाबत नुकसान झालेल्या कुटुंबीयांनी झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली याबाबतची माहिती खानापूरचे पोलीस पाटील संजय आदिक यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिली. त्यानंतर तहसीलदार पाटील यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या त्यानंतर तात्काळ टाकळीभानचे मंडलाधिकारी जनार्धन ओहळ,नाऊरचे कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांनी खानापूर परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घराचे पंचनामे करण्यास सुरवात केली आहे.यावेळी पोलीस पाटील संजय आदिक,नामदेव म्हस्के,भाऊसाहेब जोर्वेकर, पत्रकार संदीप आसने, इम्रान शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संकटकाळी लोकप्रतिनिधींची नागरिकांकडे पाठ अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळी स्थानिक (आमदार,खासदार) लोकप्रतिनिधी पाहायला सुद्धा आले नसल्याने नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here