श्रीरामपूर/प्रतिनिधी :- साहित्य ही  जीवनाची गतीनीती आहे तर संस्कृती ही समाजाची शक्तीभक्ती आहे. त्यासाठीच साहित्य आणि संस्कृतीचा सन्मान वाढला पाहिजे, असे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.
    येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान वाचनालयात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी त्यांच्या 64 वर्ष वयाच्या वाटचालीत जो जीवनसंघर्ष केला आणि शिक्षण, साहित्यनिर्मितीतून आपले जीवन घडविले त्याबद्दल साहित्य प्रबोधन मंचतर्फे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पत्रकार प्रकाश कुलथे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये,कविवर्य पोपटराव पटारे, स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे यांनी सौ. मंदाकिनी उपाध्ये व सौ. सुनीताताई पटारे यांचा सन्मान केला.प्रकाश कुलथे यांनी डॉ. उपाध्ये व कविवर्य पोपटराव पटारे यांच्या ग्रामीण भागातील साहित्य चळवळीचे वेगळेपण सांगून ग्रामीण लेखक, कवी यांना निरपेक्षपणे मार्गदर्शन, सहकार्य आणि लेखननिर्मितीतील  योगदान याबद्दल विवेचन केले.डॉ. उपाध्ये व पोपटराव पटारे यांनी कुलथे परिवाराची साहित्यसेवा, पुस्तकनिर्मिती, पत्रकार क्षेत्रातील आदर्श वाटचाल यासंदर्भाने गौरव करून साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष म्हणून प्रकाश कुलथे यांनी 2018ते 2021या काळात केलेली   साहित्यसेवा मोलाची आहे.आता साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष म्हणून स्वामीराज अनेक उपक्रम राबवून श्रीरामपूरचे साहित्य वैभव वाढवत आहेत असे सांगितले.यावेळी पटारे परिवार, उपाध्ये परिवार,कुलथे परिवार उपस्थित होते.श्रीमती सुमनबाई मांढरे, हेमंत पटारे, राहुल पटारे, सौ.आरती उपाध्ये, सौ. अंजली पटारे, सौ. वर्षा कुंभार, निर्मिक उपाध्ये उपस्थित होते. डॉ. कृपा कुलथे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here