श्रीरामपुर/प्रतिनिधी :- पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यायनुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी येत्या 1 जून ते 7 जून पर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यलयावर 1 जून ते 7 जूनपर्यंत रिपाईतर्फे आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनात कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना आठवले यांनी दिल्या आहेत.

राज्य सरकारने पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा या मागणीसाठी रिपाइं कार्यकर्ते आज तहसील कार्यालयावर निदर्शन करून तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुकाध्यक्ष तथा दत्तनगर लोकनियुक्त सरपंच सुनील शिरसाठ प्रदीप गायकवाड महिला आघाडी अध्यक्ष रमादेवी धिवर यांनी आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here