श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरात आठ गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला हातात तलवार घेवुन फिरतांना श्रीरामपुरात अटक करण्यात आली असून सदर आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 07 व राहुरी पोलीस ठाण्यात 01 असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम औदयोगिक वसाहत परिसरात हातात धारधार तलवार घेवुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस सदर इसमाचा शोध घेण्यासाठी औदयोगिक वसाहत परिसरात गेले असता सदर ठिकाणी एक इसम समोरुन हातात तलवार घेवुन येतांना दिसला त्यावेळी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफिने पकडले. व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक बबन जाधव रा. सुभाष कॉलनी वार्ड नं.६ श्रीरामपूर असे सांगीतले.पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात एक धारधार तलवार मिळुन आली त्यावरुन श्रीरामपूर शहर पोस्टेला पोकॉ/२२१० पंकज विजय गोसावी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं. ३४४/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा सराईत असुन त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ ६३/२०१५ भादवि कलम ३७९,४११,३४ प्रमाणे.

२) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ २७६/२०१३ भादवि कलम ४६१,३८० प्रमाणे.

३) राहुरी पोस्टे गु.रजि.नं. १ २८२/२०१९ भादवि कलम ३९९,४०२ प्रमाणे,

४) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. १ २११६/२०२० भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे.

५) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ५९/२०१७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.

६) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ८०/२०१७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.

७) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ३२६/२०१८ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे.

८) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ ८२/२०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे. असे सदर आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 07 व राहुरी पोलीस ठाण्यात 01 असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोस्टे संजय सानप, यांचे मार्गदर्शनाखाली पोहकॉ/जोसेफ साळवी, पोना/ कोरडे, पोना/करमल, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ/महेंद्र पवार, पोकॉ/ सुनिल दिघे, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/राहुल नरवडे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/फुरकान शेख यांचे पथकाने केली.

   गेल्या महिन्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलिसांनी एकूण सहा तलवारी पकडल्या होत्या.त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीरामपूर पोलिसांनी एक तलवार पकडली आहे. असे आतापर्यंत आठ तलवारी हस्तगत करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here