श्रीरामपुर/प्रतिनिधी : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. तसेच आता ग्रामीण भागातही ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील अनेक संस्था मदत करण्यास सरसवल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर भिमशक्ती संघटनेने देखील धान्य स्वरुपात गावातील गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.

तसेच ‘मदत म्हणून भीमशक्ती संघटनेने प्रत्येकी ५ किलो गहू वाटप केले असून यापुढील काळात सुद्धा आम्ही अशीच मदत करू असे भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी सांगितले दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी गर्दी करू नका, ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घ्या, ‘लॉकडाऊन’ला चांगला प्रतिसाद घ्या, पोलिसांना सहकार्य करा,’ असं आवाहन संदीप मगर यांनी  केलं आहे.

यावेळी भिमशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड सुनील संसारे नितीन वाघमारे दिलीप वाघमारे भारतभाऊ लोखंडे सचिन खांडरे प्रमोद भालेराव बाबा बनसोडे सोमनाथ पटाईत अंबादास निकाळजे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here