श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.चंद्रकांतजी हंडोरे यांच्या नेतुत्वात असलेली भिमशक्ती सामाजिक संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या दत्तनगर येथे असलेल्या निवासस्थानी बैठक ०५ मे २०२१ रोजी पार पडली या बैठकीला श्रीरामपुर तालुक्‍यातील फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अनेक तरुणांनी भाग घेतला.

या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणुन दिलीप वाघमारे यांची निवड करण्यात आली नियुक्ती झालेल्या दिलीप वाघमारे यांना भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले संघटना वाढीसाठी व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे दिलीप वाघमारे हे मोठ्या जोमाने कार्य करतील व युवा वर्ग मोठ्या जोमाने त्यांच्या नेतुत्वात कार्य करतील असा विश्वास आहे असे भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप मगर यांनी व्यक्त केले .

यावेळी भिमशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड सुनील संसारे नितीन वाघमारे दिलीप वाघमारे भारतभाऊ लोखंडे सचिन खांडरे प्रमोद भालेराव बाबा बनसोडे सोमनाथ पटाईत अंबादास निकाळजे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

दिलीप वाघमारे यांनी जिल्ह्याच्या  सर्व कार्यकारीणीचे नियुक्तीबद्दल आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here