श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील वॉर्ड क्रमांक २ स्थित काजीबाबा रोडवरील नुकताच झालेल्या डांबरीकरण रस्त्यास जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली चक्क जेसीबीच्या सहायाने उकरण्यात आले आहे,
अनेक वर्षांपासून या खड्डे रहित रस्त्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही, परीसरात नागरीकांना वर्षानुवर्ष याच रस्त्याने मार्गक्रमण तथा वाहने चालवितांना मोठा  मनस्ताप सहन करावा लागत असे,मात्र पुढे होऊ घातलेल्या नगर पालिका निवडणुकीमुळे सध्या सर्वच नेते, अभिनेते, विद्यमान/माजी/भावी नगरसेवक खडबडून जागे झाले आहेत तथा विकासकामांच्या बाता मारत फिरत आहेत,मात्र आपल्या प्रभागात गत साडेचार वर्ष आपले तोंड न दाखवणाऱ्या या मंडळींना आता थातूर-मातुर पद्धतीने गुणवत्ताहीन विकासकामांच्या मोबदल्यात टक्केवारीचे डोहाळे तर लागले नव्हेना ? असाही संशय बळावत आहे,
पहीले गुणवत्ताहीन विकासकामे करायची,त्याची टक्केवारी पदरी पाडून घ्यायची, मग दुसरे विकासकामे काढायची व झालेले विकासकामे विनाकारण तोडायची पुन्हा नव्याने तिच कामे करत पुन्हा टक्केवारी पदरी पाडून घ्यायची असे तर नव्हेना ?, याचा अधिक प्रमाणात संशय बळावत आहे,
कारण नुकताच झालेल्या काजीबारोडवरील डांबरीकरण कामे तोडण्याआधी जल वाहिनेचे कामे करायला काय हरकत होती ?, डांबरीकरण झाल्यावरच का जलवाहिनी दुरुस्ती कामांचा पुळका आला आहे ?, का झालेली कामे तोडण्यात येत आहेत ?, डांबरीकरण आधी का नाही जल वाहिनेचे कामे करण्यात आले ?, आता रस्ता खंदुन जल वाहिनेचे कामे करण्यात येत आहे,मग पुन्हा रस्त्यावर डांबरीकरण करणार की रस्ता तसाच जैसे थे पुन्हा खड्डेरहीत असणार ?,असे एकना अनेक टक्केवारीच्या संदर्भात संशयास्पद अनेक प्रश्न अनुत्तरितच असल्याने परीसरातील नागरीकांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे,
मात्र सदरील जलवाहिनी विकासकामांच्या नावाखाली खंदलेला रस्ता पुन्हा डांबरीकरण न केला गेल्यास तथा परीसरातील नागरीकांच्या ज्वलंत प्रश्नांना समजुन न घेतल्यास समाजवादी पार्टीतर्फे श्रीरामपूर नगर पालिकेसमोर आमरण उपोषण छेडले जाईल अशा इशारा समाजवादी पार्टीचे अहमदनगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here