श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील शिरसगांव परिसरातील रिक्षाचालक आबासाहेब उंडे या रिक्षाचालकाने दोन महिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या रिक्षातून कोरनो रुग्णांना मोफत दवाखान्यात उपचारासाठी नेले एवढंच नव्हे तर हाँस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसोबत पेशंटला उचलुन बेड पर्यंत नेत्याचं काम या सर्वसाधारण रिक्षावाल्याने केले आहे.
दोन महिन्यापासून कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. रुग्नवाढीमुळे बेड व अँम्बुलन्स मिळत नसल्याचे लोकांना शक्य होईल तितकी मदत करण्याचा निर्णय या रिक्षावाल्याने घेतला. या आजारपणामुळे मित्र व नातेवाईक देखील आपल्या माणसांपासून लांब होतांना दिसल्यामुळे स्वतः कोरोना रुग्णांना उचलून स्वतःच्या रिक्षात मोफत कुठलाही मोबदला न घेता दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
आत्तापर्यंत १५०-२०० रुग्णांना दवाखान्यात दाखल केले आहे. रुग्ण ओळखीचा असो किंवा नसो रुग्नवाहीकेची वाट न बघता रुग्णांना स्वतः उचलून दवाखान्यात नेण्याचे हे मोठं काम या सर्वसामान्य गरिब रिक्षाचालकाने केले आहे.
उंडे यांच्याशी संपर्क साधला असता ३ महिन्यापूर्वी त्याची मावशी यांना ह्रदय विकाराचा घटका आला असतांना रुग्नवाहीका न भेटल्यामुळे त्या घरी मरण पावल्याने उंडे यांनी हा समाजसेवेचा निर्णय घेतला.
त्यांच्या या उल्लेखनीय कामागिरीबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातुन कौतुक होत आहे.