श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  तालुक्यात विविध ठिकाणी आज दि ६/६/२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी भेटी दिल्या श्रीरामपूर शहरामध्ये पर्यावरण दिना निमित्ताने वृक्षारोपण विविध ठिकाणी  भाजपा जिल्हाध्यक्ष  राजेंद्र गोंदकर व युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या हस्ते  करण्यात आले .

तसेच बेलापूर व  भेर्डापुर येथील  कोविड सेंटर ला भेट दिली. या वेळी बेलापूर येथे सरपंच महेंद्र साळवी , उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुनील मुथा, पुरूषोत्तम भराटे, प्रफुल्ल डावरे, रंजीत श्रीगोड, व बेलापुर ग्रामस्थ तसेच  भेर्डापुर या ठिकाणी बाळासाहेब धनवटे , डॉ. संदीप कवडे , डॉ. प्रमोद कवडे, भाऊसाहेब बडाख हे उपस्थित होते. कोविड काळात मदत करणारे डाॅ  व गावातील कार्यकर्ताना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला

पढेगाव व कारेगाव या ठिकाण च्या ग्रामपंचायत ला भेट सत्कार स्वीकारण्यात आला. यावेळी उपसभापती बाळासाहेब तोरणे,  माजी सरपंच सदा मामा लिपते, उपसरपंच उमाकांत कांदळकर ,प्रवीण लिपटे , मुकुंद लबडे, महेश खरात हे पढेगाव मध्ये उपस्थित होते. तर सरपंच आनंद वाघ , ग्रामपंचायत सदस्य प्रणव भारत हे उपस्थित होते.

टाकळीभान या ठिकाणी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेल्या 45 दिवसांपासून चालण्यात येणाऱ्या गरीब थाळी ला भेट दिली. या गरीब थाळीचा दोन हजार हुन अधिक  नागरिक रोज लाभ घेत आहेत. या कार्यात कार्यकर्ते आपला पुर्ण वेळ देऊन हे पुण्याचं काम रोज मार्गी लावत असतात.विशेष म्हणजे या कामास विदेशातून ही देणगी मिळालेली आहे .भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकारणा बरोबरच समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असतो . या वेळी  उपस्थित कार्यकर्ता ना जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी मार्गदर्शन केले  या भेटी प्रसंगी डॉ. भागवत, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी ,जिल्हाउपाध्यक्ष गणेश राठी , सतीश सौदागर , रामभाऊ तरस, सांस्कृतिक प्रकोष्ट जिल्हा संयोजक बंडुकुमार शिंदे, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा  संयोजक विठ्ठल राऊत , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे ,जिल्हा सचिव अनिल भानगडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बबन मुठे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे , सरचिटणीस प्रफुल्ल डावरे , तालुका चिटणीस प्रतापराव मगर, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष रुपेश हरकल , जिल्हा चिटणीस सोमराज कावळे , अक्षय नागरे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव, श्रीरामपूर शहराध्यक्ष मारुती बिंगले , मुकुंद हापसे, नारायण काळे, मिलिंदकुमार साळवे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय वरपे पंडीत विशाल अंभोरे, विजय आखाडे यांसह आदी कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here