लोकजागृतीसाठी ठिकठिकाणी डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज

श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी)- संभाव्य तिसऱ्या करोना लाटेचा धोका लक्षात घेऊन पालकांनी घाबरुन न जाता लहान मुलांच्या बाबतीत सतत सावध राहुन आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच यासंबंधी लोकजागृतीसाठी ठिकठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांनी पुढे येऊन सामुहिक काम करणे गरंजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तसेच शिर्डीच्या साईबाबा संस्थांनच्या कोविड टॉस्क फोर्सचे. अध्यक्ष डॉ. कुमार चोथाणी यांनी बोलताना व्यक्त केली. लहान मुलांचे अजून लसीकरण झालेले नाही. त्यामुळे करोना रोखण्यासाठी नेहमीप्रमाणे मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन्सयुक्त सकस आहार द्यावा. त्यात फळे, भाजीपाला यांचा समावेश असावा.

एखाद्या घरातील कोविड रुग्ण जर विलिगिकरणात असेल तर त्यापासून. लहान मुलांना दुर ठेवावे. लहान मुलांना मोठ्या व्यक्तीप्रमाणे. ताप, सर्दी, घसा दुखणे ही. कोविडची लक्षणे असतात, परंतु त्याचबरोबर आहार कमी होणे, मंद पडून , हालचाली कमी-होणे, तसेच जुलाब होणे, अंगावर लाल पुरळ. येणे, डोळे लाल होणे अशीही लक्षणे दिसून येतात, असेही डॉ. चोथाणी यांनी सांगितले.

मुलांना ताप आला तर तात्काळ निकटच्य़ा डॉक्टरांना दाखवून तापाची कारणे समजून घ्यावीत. तसेच मुलांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन, श्वासाची गती, त्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे. या गोष्टी सामान्य असंतील तर कोणताच धोका नाही. सामान्यपणे ९५ टक्के मुले पॅरासिटीमॉलच्या गोळीने घरच्या घरी प्रथमोपचाराने तापमुक्त होतात. त्यांना अनावश्यक अँटिबायोटिक देणे टाळावे. त्याऐवजी मुलांना भरपूर पाणी प्यायला दिले पाहिजे. दुदैवाने १-२ वर्षांच्या लहान मुलांना कोविड झाला तर त्यांची योग्य काळजी घेणे तसेच विलगिकरण करणे अवघड होते. अशावेळी ज्यांना कोविडं होऊन गेला त्यांच्यात अँटिबॉडीज तयार होतात त्यांनी या मुलांना सांभाळणे फायदेशीर ठरते. स्तनदा मातेला कोविड झाला तरीही तिने बाळाचे स्तनपान बंद करु नये. मात्र असे न केल्यास त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम कूपोषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुलांना कोविडचा फारसा धोका नाही.

अगदी ९५ टक्के मुले प्रथमोपचार व पूर्वदक्षता यातून बरे होतात. तसेच ३ ते ‘४ टक्के मुले स्थानिक किंवा तालुकास्तरावर बरे होऊ शकतात. अगदी एखाद्या रुग्णाला गंभीर झाल्याने बाहेर हलविण्याची गरज भासते, असे दुसऱ्या लाटेत कोविड झालेल्या बालरुग्णांच्या बाबतीत दिसून आले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता उपचार पद्धती समजून घेऊन योग्य ती पूर्वदक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही डॉ. चोथाणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here