श्रीरामपुर/प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसरे लाटेत अहमदनगर जिल्हातील अवस्था संपुर्ण महाराष्ट्रात वेगळीच होती. त्यांतच जिल्हाने पहीला क्रमांक पटकावले सारखेच होते या लाटेत अनेक जीव गेली गावचे गाव खाली झाली अनेक घरे बसले मुले अनाथ झाली बंगले गाडी यांना वारसचं उरले नाही अशी भयानक परीस्थीती या अहमदनगर जिल्हाची मागच्या 3 ते 4 महीन्यात झाली दोन दिवसापुर्वी रेड झोन मध्ये असणारा आपला जिल्हा अचानक अशी कोणती जादु झाली की संपुर्ण अनलॉक करण्यांचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील लसीकरण अजून पूर्ण झाले नाही तालुक्याची नागरिकांची संख्या लक्षात घेता प्रत्येक दिवशी लसीकरणाचे डोसे कमी येत असून यामध्ये प्रशासनाची धावपळ होत आहे एक दिवस लसीकरण होते तर तीन दिवस लसीकरण बंद असते अशा परिस्थितीमध्ये अनलॉक ला काही टप्पे दिले असते तर प्रशासनाच्या दृष्टीने बरे झाले असते असे वाटते परंतु घाईगडबड करून अनलॉक करणे कितपत योग्य टप्पा न घेता हा असा अनलॉक झालाच कसा असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे मग जनतेने मायबाप सरकारला व प्रशासनाला जबाबदार धरावे का? भविष्यात काही आपत्कालीन परीस्थीती उद्भवली तर जबादारी कोन घेणार आहे हे आधी स्पष्ट करावे असे भाजपा अनुसुचित जाती मोर्चा अहमदनगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.