श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी आज अचानक श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण तालुका श्रीरामपूर भेट दिली. आणि दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले .स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करून कामांविषयी माहिती घेतली. खासदार लोखंडे साहेब, आमदार कानडे साहेब, सरपंच दिनकरराव बनसोडे साहेब, संगमनेर डिव्हिजन चे प्रमुख पाटील साहेब यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून कामांविषयी माहिती घेतली. अडबंगनाथ संस्थांनच्या कार्याला सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी फोन द्वारे केली, सकाळी 9 ते 12 तीन तास थांबून सर्व प्रकारची महाराजांशी चर्चा केली. मंदिरातील नक्षीकाम बघून राम अश्रूंची शिळा व अडबंगनाथ यांनी बारा वर्ष तप केलेली भूमी हे सर्व बघून खूपच समाधान व्यक्त केले. महाराजांना सांगितले की मी आपला शिष्य आहे. आपल्या संस्थानच्या कामासाठी मला कधी ही फोन करा. मग जिल्ह्यातील राज्यातील आणि दिल्लीतील  ते कुठलेही काम असो मी मार्गी लावेल, महादेव जानकर साहेबांचे कार्य महाराष्ट्रासह २८ राज्यात चालू आहे. आणि या ठिकाणचे संपूर्ण रस्ते कसे करता येईल या ही विषयी त्यांनी चर्चा केली. मंदिराचा संपूर्ण परिसर, सुंदर झाडी, सुंदर वातावरण, सुंदर मंदिर हे सर्व बघून अत्यंत समाधान व्यक्त केले. जानकर साहेबां समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब झुंजारे, चोरमले शास्त्री महाराज, आश्रमातील विद्यार्थी, हे होते.  स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजांशी बोलून भेटून खूप समाधान वाटले, असेही ते यावेळी म्हणाले. स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांनी महादेव जानकर साहेब यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here