श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  विविध उद्देश घेऊन श्रीरामपुर नगरीत सचिन दांडगे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. कोहिनूर टेक्निकल येथे नुकत्याच झालेल्या सचिन दांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे औचित्य साधून सचिन दांडगे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सहाय्य धन देणे, उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे, सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, महिला सबलीकरण यासाठी उपक्रम राबवणे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे या उद्देशाने श्रीरामपुर मध्ये सचिन दांडगे फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याची माहिती सचिन दांडगे फाउंडेशनचे राहुल बारसे यांनी दिली आहे.

फौंडेशन स्थापना कार्यक्रमाला करिअर पोर्टल चे संचालक राहुल बारसे, क्वीकअप ऍडव्हरटायझिंग चे संचालक गोयल त्रिभुवन, कारेगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश आव्हाड, सनी बिऱ्हाडे, सुधीर खपके, महेंद्र पटारे, लकी दासरजोगी, मनसे तालुका संघटक विष्णू आमोलीक, अभिजित चक्रे, डॉ.महेश शरनागत, डॉ.संदीप बढे, रिपाई चे उत्तर नगर जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व  मान्यवराचें गोयल त्रिभुवन यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here