श्रीरामपुर/प्रतिनिधी :- माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट,श्रीरामपूर अंतर्गत सुरु असलेल्या प्राईड अकॅडमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भेर्डापूर-वांगी येथे मा. पशुसंवर्धन व दुग्ध व मत्स्यविकास कॅबिनेट मंत्री मा. ना. महादेवराव जानकार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. शैक्षणिक दर्जा बघता या शाळा व महाविद्यालातून आय. एस दर्जांचे अधिकारी निपजतील व देशसेवा करतील असे प्रतिपादन शालेय परिसरात वृक्षारोपण करत असताना मा. ना. महादेव जानकर साहेब यांनी केले.
ना. जानकर साहेब यांनी नुकतीच प्राईड अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते की, ग्रामीण भागात मुलींना दहावीनंतर शिकविण्याचे प्रमाण कमी असते. प्राईड महाविद्यालय हे ग्रामीण भागातील एक दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय श्री. माऊली मुरकुटे व डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आपल्या परिसरात असलेल्या या ज्युनिअर कॉलेजमुळे मुलींना पुढील दर्जेदार शिक्षण घेता येईल. त्यातून वेगवेगळ्या पदांवर प्राईडचे विद्यार्थी नक्कीच विराजमान असतील अशी खात्री वाटते.
यावेळी प्राईड महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोकणे यांनी प्रास्ताविक केले, प्रा. सागर आहेर यांनी आभार मानले. नानाभाऊ जुंदारे, भेर्डापूरचे उपसरपंच प्रताप कवडे, चंद्रकांत कांदळकर भेर्डापूर, उमेश गायकवाड वांगी, योगेश उंडे कारेगाव , किशोर नवले, हेमंत टिळेकर, बाबासाहेब ढेरे, राजेंद्र बोरावके, राकेश गायकवाड, विजय तोडमल आदि उपस्थित होते.