बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रवरा नदी पात्रात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळून आले असुन प्रवरा नदीच्या पुलावर एक हीरो होंडा मोटारसायकल  सापडली आहे  मोटार सायकलला असलेल्या कागदपत्रावरुन संबधीत ईसमाची ओळख पटली आहे              

बेलापुर येथील प्रवरा नदी पात्रात अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक देविदास देसाई किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक मोटारसायकल उभी असल्याची माहीती मिळताच हवालदार अतुल लोटके माजी सरपंच भरत साळुंके देविदास देसाई किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जावुन गाडीची पहाणी केली असता एम एच 17 ऐ एल 5198  ही हीरो होंडा कंपनीची गाडी  हँण्डल लाँक केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली  गाडीला खराब झालेला भाजीपाला तसेच वजनकाटा एक पिशवी तसेच एक डायरी आढळून आली या डायरीत शंकर उत्तम गलांडे नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र तसेच काही फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडली त्यावरुन संपर्क साधला असता शंकर  हा तीन दिवसापासुन घरी आलेला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले  पोलीसांनी खटकाळी येथील गणेश अल्हाट नितीन जगताप दिनेश शेलार विश्वास बागुल सुरेश छल्लारे यां पोहणार्या तरुणांना बोलावुन ते प्रेत पाण्याबाहेर काढले पढेगाव येथील नातेवाईकांनी ते प्रेत शंकर उत्तम गलांडे वय वर्ष 31 याचेच असल्याचे सांगितले बेलापुर पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपुर येथे पाठवीले आहे  पोलीसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा रजिस्टर नंबर 55/2021 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here