श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्‍यातील दत्तनगर येथील अनिता कदम यांची जय भीम आर्मी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांची निवड नितिनभाऊ मोरे संस्थापक अध्यक्ष महा सचिव संजयजी कांबळे सुनिल जगताप जिल्हा अध्यक्ष अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितिनभाऊ मोरे व महा सचिव संजयजी कांबळे व जिल्हाध्यक्ष  सुनिल जगताप हे आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनिल जगताप म्हणाले जय भीम आर्मी संघटना फुले, शाहू, आंबेडकर , छत्रपती शिवजी महाराज यांच्या विचारांची असून आम्ही प्रमाणिक पणे काम करत आहोत.आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार, अन्याय अत्याचारला वाचा फोडण्याचे काम करणार, गोर गरीब जनते साठी शासनाच्या नविन योजना असतील त्या त्यांच्या पर्यंत पोहवचवनार आहोत. श्रीरामपुर तालुक्यात प्रत्येक गावी जय भीम आर्मी शाखा उदघाटन करणार असल्याचे ही ते म्हणाले,

अनिताताई कदम नियुक्ती झाल्यानंतर बोलताना म्हणाले जय भिम आर्मी हा विचार आहे कुठल्याही एका जाती धर्मा पुरते मर्यादित न रहाता सर्व धर्म समभाव अन्याय अत्याचार हा कुठल्याही समाजावर असो तो सहन केला जाणार नाही हा विचार म्हणजेच जय भिम आर्मी अहमदनगर जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक गावात महीला संघटन उभे करणार असे  सांगितले आहे

यावेळी संजय साळवे, राजु घोडेराव,  साहेबराव निकाले, रविन्द्र लोखंडे, रमेश गोरे, भाऊराव चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here