श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महाराष्ट्र विश्वकर्मा सेना कारागीर युनियन विभाग अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी श्रीरामपुर तालुक्यातील विश्वकर्मा मंदिर सूतगिरणी या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

या उपक्रमात अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.
यात सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सुतार समाज सेवा संघ, श्रीरामपूर चे अध्यक्ष यशवंत भागवत यांच्या हस्ते वृक्ष लावून सर्व समाज बांधवांच्या उपस्थित हा उपक्रम पार पडला. लिंब, पिंपळ, आंबा, वड, बदाम, नारळ, शिरस व विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी ज्येष्ठ बांधव संस्थापक अध्यक्ष सुतार समाज सेवा संघ दिलीप सूर्यवंशी, बोर्डे साहेब, सुभाष पगारे, प्रल्हाद सोनवणे सर, दिनकर सोमवंशी, श्रावण मोरे, पांडुरंग मोरे महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेचे पदाधिकारी राज्य संघटक चंद्रकांत जाधव, जिल्हा सचिव राजेंद्र एन. सुर्यबंशी, तालुका अध्यक्ष आदेश मोरे, शहराध्यक्ष निलेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे, शहरउपाध्यक्ष रविंद्र देवरे, निलेश जाधव, ललित बाविस्कर, सोमनाथ शिरसाठ, राजेश आर. सुर्यवंशी, संघटक राजेंद्र एम. शिरसाठ, संदीप बाघ, संपर्क प्रमुख अनिल सुर्यवंशी, बाबासाहेब गवळी, सुभाष सुर्यवंशी, खजिनदार प्रशांत वाघ, मार्गदर्शक आबा जाधव, संदिप भांबरे, अशोक सुर्यवंशी, सुनिल सुर्यवंशी, अजय मोरे, सौरभ जाधव, रोहित सुर्यवंशी, रोहित देवरे, मनोज हिरे, खाजाभाई शेख, विवेक सुर्यवंंशी, विशाल खैरनार, संतोष निकम, विनोद पवार, केदार सुर्यवंशी, हेमंत मोरे, राजेंद्र पेंढारे, घोरपडे मिस्तरी, खारकर बंधू, दिपक काळे, चंदू सोनवणे ब सर्व समाज बांधव ब विश्वकर्मा टायगर फोर्स, श्रीरामपूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here