श्रीरामपूर – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका गावामधले अल्पवयीन सैराट जोडपे दोन दिवसापूर्वी त्यांच्या राहत्या घरातून मुंबईला पळून गेले होते. मुंबईला दादर भागात काही काळ थांबल्यानंतर तेथून ते बसने श्रीरामपूरला आले.श्रीरामपुरात आल्यानंतर या अल्पवयीन सैराट जोडप्याला श्रीरामपूर शहराची माहिती नसल्याने ते श्रीरामपूर शहरात इकडे-तिकडे फिरत होते.

       आज दिनांक 9 जून 2021 रोजी दुपारच्या सुमारास हे अल्पवयीन सैराट जोडपे शहरातील बेलापूर रोड भागातील बजरंगनगर परिसरामध्ये फिरतांना एका जागरुक नागरिकाला दिसून आले. म्हणून त्यांनी तात्काळ “शिवप्रहार” संघटनेच्या बेलापूररोड,बजरंगनगर येथील कार्यालयात येवुन या प्रकाराची माहिती दिली. 

       त्यानंतर सातारा पोलिसांशी संपर्क करण्यात आला. त्यावेळी असे समजले की,या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा कराड तालुक्यातील तळबीड पोलिस ठाण्यात दाखल आहे. मुलगी श्रीरामपूरला असल्याची माहीती समजल्यावर तात्काळ “सातारा पोलीस” श्रीरामपूर कडे येण्यास निघाले आहेत.

          दरम्यान शिवप्रहार प्रतिष्ठान संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे,संतोष चव्हाण,गणेश माळवे ,राहुल अस्वले,पप्पु भोसले,बंटी बाजारे व इतर कार्यकर्त्यांनी या अल्पवयीन सैराट जोडप्याला श्रीरामपूर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री.संदीप मिटके व श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप,पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवडे , महिला पोलिस शिपाई टोपे यांच्या ताब्यात सुखरूपरित्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिले.

         यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवडे यांनी जनतेने अशा प्रकारांची माहीती तातडीने पोलिसांना कळवावी असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here