राहुरी/प्रतिनिधी :- पोलिसांची टेम्पो अडवून 30 ते 40 लाखांचा चंदन साठा पकडला. पुढील कारवाई सुरू आहे. मात्र चंदन गॅंगमधील इर्षेमुळे पोलिसांच्या हाती हे चंदन लागल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे गणेश फाटक यांना टेंपो अडविण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दोन खाजगी इसम व पो.काँ.फाटक यांनी राहुरी फँक्टरी येथिल शिवाजी पुतळ्यासमोर टेंपो पकडला.

[URIS id=1702]

त्यात सुमारे 35 ते 40 लाख रुपये किंमतीचे चंदन असल्याचे समजते. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असुन दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान देवळाली प्रवरा येथील एका गँगने ही खबर पोलिसांना देऊन त्यांच्यावर सूड उगविला असल्याची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here