श्रीरामपूर :- देशामध्ये कोरोना महामारी चे सावट असताना तसेच कोरणा मुळे सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे असे असताना दुसरीकडे मात्र श्रीरामपूरतील शाळांनी या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय फी मध्ये जवळजवळ दुपटीने वाढ केल्याची तक्रार पालक वर्ग करत आहे .एक तर शाळा बंद असताना शाळेमार्फत ऑनलाइन पद्धतीने क्लासेस घेतले जात आहेत यासाठी पालकांना मोबाईल रिचार्ज करावा लागतो त्यासाठीही पालकांना खर्च येतो असे असताना कुठलेही कारण नसताना श्रीरामपूरतील अनेक शाळांनी पालक वर्गाकडे भरमसाठ फी ची मागणी केलेली आहे व त्वरित न भरल्यास मुलांचे ऍडमिशन रद्द करण्याची ही ताकीद देण्यात येत आहे देशात कोरोनामुळे लोक डाऊन झाल्याने अनेकांची रोजीरोटी बंद झाली, नोकरी गेलेल्या सर्वांना आर्थिक परिस्थितीशी सामना करून जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे त्यामुळे पालक वर्ग कडे पैसा नाही अशा परिस्थितीत शाळांनी फीमध्ये दुपटीने वाढ करून पालक वर्गाकडे फी मागण्याचा सपाटा चालवला असल्याची चर्चा सध्या पालक वर्गामध्ये होत आहे, श्रीरामपूर आतील ज्या शाळांनी फिल्ममध्ये भरमसाठ वाढ करून पालक वर्गाकडे फी साठी तगादा लावला आहे अशा शाळावर प्रशासनाने कारवाई करून वाढवलेली भी त्वरित रद्द करून आहे ती फी ची रक्कम भरण्यासाठी टप्पे करून देण्याबाबत शाळा प्रशासनास आदेशित करावे अन्यथा शाळेच्या वाढी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष रितेश एडके यांनी दिला आहे