श्रीरामपुर/प्रतिनिधी :-  हिंदू जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथील मनसे कार्यालय येथे केक कापून व १५३ वृक्ष वाटप करून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की पक्षाच्या स्थापनेपासून दर वर्षी आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटपाचे कार्यक्रम करत असतो यावर्षी ५३ वा वाढदिवस असल्याकारणाने १५३ झाडे वाटण्यात आले एवढी  झाडे वाटण्याचे कारण की कोरोना आजारामुळे अनेकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवले आहे हे दिलेले झाडे आपल्या घरासमोर व आपल्या भागात काळजीपूर्वक सर्व कार्यकर्त्यांनी लावावेत जेणेकरून आपल्या या उपक्रमाची दखल घेऊन इतर नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावतील व  झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास कोणालाही ऑक्सिजनची गरज भासणार नाही हो तसेच प्रदूषण देखील कमी होईल तसेच सदैव नागरिक निरोगी राहतील झाडांमुळे मनुष्याला अनेक फायदे आहे हे आपल्या आसपासातील नागरिकांना सर्व कार्यकर्त्यांनी समजून सांगावे व मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्यास पुढाकार घ्यावी त्यानंतर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व  पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाकड्याची आतिषबाजी करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला

याप्रसंगी जिल्हा सचिव तुषार बोबडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार, कामगार सेना सरचिटणीस नंदू गंगावणे, कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ येळे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष करण कापसे, तालुका चिटणीस विष्णू अमोलिक, शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव अमोल साबणे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ बोर्डे,  शिवनाथ फोपसे, शहर उपाध्यक्ष राजू शिंदे,  लखन कडवे, गणेश राऊत, प्रसाद शिंदे, विद्यार्थी सेना तालुकासचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय सूर्यवंशी, सचिन धोत्रे, रतन वर्मा, अभिमन्यू धर्मजिज्ञासू, अतुल तारडे, प्रवीण कार्ले, संकेत शेलार, आकाश कापसे, प्रमोद शिंदे, नितीन पवार, चंद्र शिंदे, रमेश शिंदे, दशरथ शिंदे, अशोक शिंदे, बजरंग शिंदे, गौतम शिंदे, राहुल शिंदे, मारुती शिंदे, सुरेश शिंदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here