माळवाडगांव/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील किराणा व भुसार मालाचे आडत व्यापान्याकडून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणी दोन अडीच महिन्यापासून अटकेत असलेल्या रमेश रामलाल मुथ्था, गणेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्या आणि आशा गणेश मुथ्था यांना मे. जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे.
         सदर प्रकरणा मध्ये दोषारोप पत्र दाखल झाले असून तपास पूर्ण झाला असल्याने व रकम वसूली बाबत वेगळी कार्यवाही सुरुझाली आहे म्हणून सदर प्रकरणात मुथ्था यांना जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद मुथ्था यांच्या वकीलां तर्फे करण्यात आला. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आणि गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद अँड गटने यांनी सरकार पक्षा तर्फे केला. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादा नंतर में न्यायालयाने मुध्या यांचा जामीन अर्ज मंजूर करून त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींच्या वतीने अँड. आर पी सेलोत, अँड. मयूर गांधी आणि अँड. पंकज म्हस्के यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here